ज्ञानेश्वर मंदिरातील ‘पैस खांबा’ दर्शन वादाचं CCTV फुटेज व्हायरल!
व्हायरल फुटेजमुळे मंदिर प्रतिष्ठेवर गालबोट!

संतभूमीची शांती डगमगतेय…
ज्ञानेश्वर मंदिरातील ‘पैस खांबा’ दर्शन वादाचं CCTV फुटेज व्हायरल!
व्हायरल फुटेजमुळे मंदिर प्रतिष्ठेवर गालबोट!
श्री क्षेत्र नेवासा – संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, जिथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी जन्माला आली… तिथेच आता सोशल मीडियावर एक विवादित CCTV क्लिप ट्रेंड होतोय!
काय घडलं नेमकं?
आषाढी एकादशीच्या दिवशी, लाखो भाविकांच्या गर्दीत पैस खांब दर्शनावरून एका विश्वस्त आणि उद्योजक यांच्यात वाद झाला.
तो वाद तात्काळ मिटवून प्रकरण थांबवण्यात आलं… पण ३ दिवसांनी त्याचं CCTV फुटेज व्हायरल झालं! आणि नेवासामध्ये चर्चांना उधाण आलं!
प्रश्न गंभीर आहे:
डीव्हीआरला पासवर्ड असताना फुटेज बाहेर आलं कसं?
संस्थेचं फुटेज बाहेर गेलं – जबाबदार कोण?
मंदिर संस्थाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची विनंती –
“मंदिरावर भाविकांची श्रद्धा आहे, अशा गोष्टी होऊ नयेत.
फुटेज कसं बाहेर आलं, याचा शोध घेतो.
जबाबदारांवर कारवाई होईल.
सोशल मीडियावर संस्थेची बदनामी थांबवावी!”
वारकरी संप्रदाय, माऊली भक्त आणि स्थानिक जनता संतप्त –
“संस्थेची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे!”
“ही संतभूमी आहे – वाद-वादळासाठी नाही!”
हे फक्त एक फुटेज नाही, तर श्रद्धेवर उठलेलं सावध प्रश्नचिन्ह आहे!
तुमचं मत काय?
अशा घटनांमुळे श्रद्धा ढासळते का?
कमेंट करा |
शेअर करा |
जबाबदारीने चर्चा करा