संगमनेरमध्ये संतापाची लाट!
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फ्लेक्सवर छेडछाड, तालुक्यात गडद राजकारण सुरू!

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फ्लेक्सवर छेडछाड, तालुक्यात गडद राजकारण सुरू! 
तालुक्याच्या शांततेत खळबळ
वडगाव पान येथील महादेव मंदिराजवळील शुभेच्छा फ्लेक्सवर काही समाजकंटकांनी छेडछाड केल्याने तालुक्यात संतापाचा आवाज उठला आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी या विकृत प्रवृत्तींना ठेचा देण्याची आणि त्वरित कारवाई करण्याची मागणी केलीय.
राजकारणाचं रक्तरंजित रूप?
- जातीय संघर्ष वाढले,
- विकास कामांऐवजी वादविवादावर भर,
- तालुक्यात गडद राजकीय वातावरण,
अशा घटना कधीही आधी नव्हत्या, पण आता वाटतं ‘शांतता’ला धोका आहे.
युवक काँग्रेसची हाक!
निलेश थोरात म्हणाले, “जर दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही, तर 2 दिवसांत भव्य रस्तारोको होणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.”
तालुक्यातील अनेक युवक कार्यकर्ते घटनास्थळी धावले असून शांतता राखण्याचा प्रयत्न सुरु आहे.