शिक्षण विभागात संतापाचा स्फोट! बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून अधिकारी आक्रमक, राज्यभर ‘सामूहिक रजा आंदोलन’
संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शिक्षण आयुक्त यांना यासंदर्भात निवेदन देत स्पष्ट मागणी केली आहे


पुणे : नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास चुकत्या दिशेने जात असल्याचा आरोप करत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी राज्यभर सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, गुन्हेगारांना वाचवून प्रामाणिक अधिकार्यांवर विना चौकशी अटक केली जात आहे, जी अमानवी आणि अपमानास्पद आहे.
संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शिक्षण आयुक्त यांना यासंदर्भात निवेदन देत स्पष्ट मागणी केली आहे — चौकशीपूर्वी कोणत्याही अधिकाऱ्याला अटक केली जाऊ नये आणि याचे लेखी आश्वासन द्यावे. जर हे आश्वासन मिळाले नाही, तर ८ ऑगस्टपासून बेमुदत रजा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
अधिकारी काय म्हणतात?
- “आम्ही गुन्हेगार नाही. काम करताना चुका होऊ शकतात, पण त्यावर विभागीय चौकशीची व्यवस्था आहे.”
- “विना चौकशी थेट अटक केली जातेय, त्यामुळे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.”
- “शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकावर आता स्वाक्षरी केली जाणार नाही.”
आणखी काय मागण्या आहेत?
- SIT चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय सहकार्य थांबवले जाईल
- सुटीच्या दिवशी जबरदस्तीचं काम थांबवावं
- डिजिटल कामाचा ताण कमी करावा
ही मोहीम केवळ अन्यायाविरुद्ध नाही, तर प्रामाणिक प्रशासनाच्या हक्कांसाठी आहे. अधिकारी म्हणतात, “आम्ही संविधानिक मार्गाने न्याय मिळवू.” आता पाहायचं म्हणजे शासन या आंदोलक अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देतं का?
#EducationRevolt #OfficerStrike #ShalarthScam #TeachersRights #RajpatritAdhikariAndolan #MaharashtraNews #MetroPortalExclusive