नगर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत फोडली अनेक दुकाने
ही सिस्टिमॅटिक चोरी एका गँगने रचली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


अहिल्यानगर – नगर शहराच्या गजबजलेल्या चितळे रोड आणि सर्जेपुरा भागात 4 ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः हाहाकार घातला! 

एका रात्रीत एक नव्हे, दोन नव्हे तर अनेक दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून स्पष्ट दिसतं की हे चोरटे एका मोटारसायकलवर आले होते. पोलिसांनी मोटारसायकलच्या नंबरवरून तपास केला असता ती माळीवाडा परिसरातून चोरीला गेलेली असल्याचं उघड झालं! 

चोरीची झलक…
चितळे रोडवरील D. चंद्रकांत टेलर या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. काउंटरमध्ये ठेवलेली ₹2 ते ₹2.5 लाखांची रोकड त्यांनी लंपास केली! 

सकाळी दुकान उघडताच चोरीचा प्रकार निदर्शनास आला आणि दुकानदार चंद्रकांत दुलम यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच कोतवाली पोलीस, गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक राजू वाघ, आणि पोलीस अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी CCTV फुटेज हस्तगत करून तपास सुरू केला आहे. 

त्याच रात्री छाया टॉकीज समोरील हॉटेल प्यासा आणि कल्पेश बियर अँड वाईन शॉप यांचीही शटरं उचकटलेली आढळली. सुदैवाने चोरट्यांनी आत प्रवेश केला नव्हता. 
सर्जेपुरा येथील सागर मोटर्स हे स्पेअरपार्ट्सचे दुकानही चोरट्यांच्या निशाण्यावर आलं. येथेही दुकान फोडल्याचे सीसीटीव्हीमधून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण सुरू केलं असून चोरट्यांचा मागोवा घेण्यात येतो आहे.
चोरी झालेल्या D. चंद्रकांत टेलर हे दुकान कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर इतर दुकाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. त्यामुळे दोन्ही ठाण्यांचे पथक सक्रिय झाले आहे.
युवांनो, सावध राहा!
ही सिस्टिमॅटिक चोरी एका गँगने रचली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चोरट्यांनी चोरीची मोटारसायकल वापरणे, वेगवेगळी ठिकाणं टार्गेट करणे यामधून त्यांच्या पूर्वनियोजित प्लॅनिंगचा सुगावा लागतो.
दुकानदारांनी आपल्या दुकानात सुरक्षित CCTV, अलार्म सिस्टीम आणि डबल लॉकिंग सिस्टम वापरणं आता अत्यावश्यक झालं आहे.
नगरकरांनो, ही बातमी तुमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करा! चोरट्यांना शोधून काढण्यासाठी एकत्र या!
#AhmednagarTheft #CityInShock #ChitaleRoadRobbery #SarjeepuraNews #MetroNews #CCTVFootage #ChorPakdaJaayega #StayAlert #SafeCityCampaign 


