युवकांनी फक्त Self साठी नव्हे, Society साठी जगायला शिका! – प्रा. गणेश निमसे
“युवकांनी ‘मी’ पेक्षा ‘आपण’ विचारात प्राधान्य दिलं, तर देशाचं भवितव्य उज्ज्वल होणार हे नक्की!” — असं दमदार वक्तव्य केलंय राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. गणेश निमसे यांनी.
युवकांनी फक्त Self साठी नव्हे, Society साठी जगायला शिका! – प्रा. गणेश निमसे
कोपरगाव | पोलीस न्यूज नेटवर्क
“युवकांनी ‘मी’ पेक्षा ‘आपण’ विचारात प्राधान्य दिलं, तर देशाचं भवितव्य उज्ज्वल होणार हे नक्की!” — असं दमदार वक्तव्य केलंय राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. गणेश निमसे यांनी.
सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रा. निमसे म्हणाले —
“युवक ही समाजाची खरी ताकद आहेत. त्यांच्यात नेतृत्वगुण आहेत, नवकल्पना आहेत आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमकही आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही त्यांच्यासाठी एक ‘संस्काराची वर्कशॉप’च आहे!”
“तुमचं Future घडवायचंय? मग WhatsApp वर घालवणारा वेळ NSS मध्ये घाला!”
“तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा, Social Media पेक्षा Social Work महत्त्वाचं.”
“व्यसनमुक्त राहा, समाजासाठी काम करा – आणि खरं ‘Influencer’ बना!”
या कार्यक्रमाला उपस्थित होते:
डॉ. गायकवाड बी.एस., डॉ. माधव सरोदे (प्राचार्य), डॉ. बंडेराव तहऱ्हाळ (NSS समन्वयक), डॉ. भगत, डॉ. सैंदनशिव, डॉ. दाणे, डॉ. वाघमोडे, डॉ. चव्हाण यांच्यासह NSS चे शेकडो स्वयंसेवक.
सूत्रसंचालन: प्रा. अश्विनी पाटोळे
आभार: प्रा. महेश दिघे