गुड न्यूज! ‘अहिल्यानगर ते पुणे’ वंदे भारत एक्सप्रेस येतेय धावत… 10 ऑगस्टपासून थरारक सुरुवात!
नागपूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेसला ‘अहिल्यानगर’ थांबा | प्रवाशांसाठी सुपरफास्ट सुविधा!
गुड न्यूज! ‘अहिल्यानगर ते पुणे’ वंदे भारत एक्सप्रेस येतेय धावत… 10 ऑगस्टपासून थरारक सुरुवात!
नागपूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेसला ‘अहिल्यानगर’ थांबा | प्रवाशांसाठी सुपरफास्ट सुविधा!
अहिल्यानगर – पुणे – नागपूर यांच्यातील अंतर आता जलद आणि आरामदायी! कारण 10 ऑगस्टपासून नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे – आणि विशेष म्हणजे अहिल्यानगर आणि कोपरगाव
महाराष्ट्रातील 12वी वंदे भारत ट्रेन… आणि ती थेट आपल्या जिल्ह्यातून!
नगरचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी सोशल मीडियावर ही आनंददायी बातमी दिली. त्यांनी म्हटलं –
“ही सेवा विद्यार्थ्यांसाठी, नोकरदारांसाठी आणि व्यावसायिकांसाठी गेम चेंजर ठरेल! महायुती सरकारचे यासाठी मनःपूर्वक आभार!”
10 ऑगस्टपासून धमाका!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 ऑगस्ट रोजी पुणे – नागपूर, बंगळुरु – बेळगाव, आणि अमृतसर – कटरा या तीन मार्गांवरील वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
हा ऐतिहासिक क्षण मोदीजींच्या कर्नाटक दौऱ्यातील एका कार्यक्रमात पार पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
वेळापत्रक झटक्यात जाणून घ्या:
पुणे ते नागपूर : सकाळी 6.25 वाजता सुटका
नागपूर ते पुणे : सकाळी 9.50 वाजता सुटका- मार्ग: अहिल्यानगर – कोपरगाव – मनमाड मार्गे
फायदा?
पूर्वीचा 16-18 तासांचा प्रवास आता 12 तासांत पूर्ण! आणि तेही वंदे भारतच्या सुपरफास्ट कंफर्टमध्ये!
शेअर करा ही ग्रेट बातमी!
आपल्याच जिल्ह्यातून वंदे भारत! अभिमान वाटावा अशी बातमी, नक्की व्हायरल करा!

महाराष्ट्रातील 12वी वंदे भारत ट्रेन… आणि ती थेट आपल्या जिल्ह्यातून!
10 ऑगस्टपासून धमाका!
वेळापत्रक झटक्यात जाणून घ्या:
शेअर करा ही ग्रेट बातमी!