⚠️🔥 13 ऑगस्टला ‘भूमीहक्कासाठी रणसंग्राम’!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य भिल्ल सेनेचं आमरण उपोषण!

⚠️🔥 13 ऑगस्टला ‘भूमीहक्कासाठी रणसंग्राम’! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य भिल्ल सेनेचं आमरण उपोषण!

नगर (प्रतिनिधी)
“जमीन आमच्या हक्काची – लढा शेवटच्या श्वासापर्यंतचा!”
बेळपिंपळगाव (ता. नेवासा) येथील वर्ष 1961 पासून शेतकी करत असलेल्या भिल्ल समाजाच्या शेतजमिनीवर मालकी हक्कासाठी एकलव्य भिल्ल सेना आणि तंट्यातात्या भिल्ल क्रांती फोर्स कडून 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे!

काय आहे भिल्ल समाजाची मागणी?

  • 1961 पासून शेती करत असलेल्या शासकीय जमिनीवर मालकी हक्क द्या!

  • लिमिटेशन अ‍ॅक्ट 1963भारतीय संविधानाच्या कलम 65 नुसार आम्हाला न्याय मिळावा!

  • CPC 1908 कलम 151 नुसार चौकशी होईपर्यंत कुठलीही पोलीस कारवाई नको!

फॉरेस्ट जमीन सर्वे नं. 197 व 395 वर वर्षानुवर्षे बागायती पिके घेतली जात आहेत. ती जमीनच कुटुंबांचं एकमेव जीवनाधार आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने देऊनही न्याय न मिळाल्याने अखेर आता ‘रस्त्यावर’ उतरायची वेळ आली आहे!

कोण होते उपस्थित?

एकलव्य भिल्ल सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे, तंट्यातात्या फोर्सचे संपतराव मोरे, सुधाकर सुरसे, अविनाश सूर्यवंशी, मीराबाई, विमलताई, नर्मदाबाई, पद्माबाई बर्डे, बाळू मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या.

“जर अजूनही न्याय मिळाला नाही, तर लढा आणखी तीव्र करू!” – असा इशाराही संघटनांनी दिला आहे.


📢 हे पोस्ट करा – शेअर करा – आवाज बनवा!
#भिल्लसेना #भूमीहक्क #आमरणउपोषण #GroundReality #MetroNewsLive #JusticeForTribes #EklavyaSena