अहिल्यानगर LCB खंडणी प्रकरण – चौकशी ‘थंड’ मोडवर?
अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेतील (LCB) चार अधिकाऱ्यांवर दीड कोटींची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप



अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेतील (LCB) चार अधिकाऱ्यांवर दीड कोटींची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना 21 जुलै रोजी निलंबित करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी P.S.I. तुषार धाकराव, हवालदार मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे आणि गणेश भिंगारदे यांच्यावर कारवाई केली.
घटना काय?
आर्थिक गुन्ह्यातील एका आरोपीकडून, खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून, या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ₹1.5 कोटींची खंडणी घेतली. हे पैसे बँकेच्या विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले, आणि धक्कादायक म्हणजे, हा सर्व ‘उद्योग’ पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्येच झाला! 
चौकशी कुठे अडकली?
या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्याकडे देण्यात आली. पण आता जवळपास 20 दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. ना गुन्हा दाखल, ना आरोपींना अटक… फक्त चौकशी ‘चालू’ असल्याचं सांगितलं जातंय.
संपर्क साधण्याचा प्रयत्न फेल!
माध्यमांनी आणि सोशल मीडियावरून डॉ. गोर्डे यांच्याशी फोन आणि व्हॉट्सअॅपवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
दुहेरी मापदंडाचा आरोप!
सर्वसामान्य नागरिकांवर असा आरोप झाला असता, तर लगेच गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकलं गेलं असतं. मात्र, पोलिसांच्या बाबतीत ‘विशेष सवलत’ दिली जात असल्याची चर्चा रंगली आहे.
जनतेचा सवाल
- एवढी मोठी रक्कम कोणाच्या खात्यात गेली?
![🏦]()
- गुन्हा अद्याप का दाखल नाही?
![📄]()
- चौकशी खरंच चालू आहे की मुद्दाम थंडावली जातेय?
![🤔]()


