राहुल गांधींचा मोठा खुलासा! – “माझ्या जीवाला गंभीर धोका”
पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध केलेल्या कथित बदनामीच्या आरोपांवरील खटल्याच्या सुनावणीत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी विशेष न्यायालयात धक्कादायक माहिती सादर केली. त्यांनी लेखी निवेदनात


पुणे
– स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध केलेल्या कथित बदनामीच्या आरोपांवरील खटल्याच्या सुनावणीत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी विशेष न्यायालयात धक्कादायक माहिती सादर केली. त्यांनी लेखी निवेदनात दावा केला की, त्यांना वैयक्तिक सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे! 
राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी सांगितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतचोरीचा मुद्दा मांडल्यानंतर देशात राजकीय तणाव
वाढला आणि याचा थेट परिणाम म्हणून राहुल गांधींना धमक्या मिळू लागल्या.
धमक्या कशा मिळाल्या?
निवेदनात धक्कादायक खुलासा करण्यात आला की, भाजप नेते तरविंदर मारवा यांनी धमकी दिली –
“ते नीट वागले नाहीत, तर त्यांच्या आजी इंदिरा गांधींसारखे होईल!”
तसेच दुसऱ्या एका भाजप नेत्याने त्यांना थेट –
“देशाचा नंबर वन दहशतवादी”
असं म्हटलं!
याशिवाय, तक्रारदार सत्यकी सावरकर यांचा नाथुराम गोडसे कुटुंबाशी असलेला संबंध, सध्याचं धार्मिक-राजकीय वातावरण, आणि जहालमतवादी हिंदुत्ववादी गटांकडून मिळणारा धोका – या सर्व गोष्टींनी परिस्थिती अजून धोकादायक झाली आहे, असा दावा राहुल गांधींचा आहे.
राहुल गांधींचं म्हणणं –
- खटला दाखल करणाऱ्यांचा उद्देश समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक वातावरण दूषित करणे
आणि ठराविक उद्योजकांचे हित साधणे आहे. - भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा आदर राखत, न्यायालयाने बाहेरील दबाव आणि असामान्य परिस्थितीचा विचार करावा.
आता विशेष न्यायालय राहुल गांधींच्या या सुरक्षा मागणीवर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
राजकारण, धमक्या आणि कोर्टरूम ड्रामा – या सर्वांचा संगम असलेली ही केस आता हाय-प्रोफाइल टप्प्यात प्रवेश करतेय! 


आणि ठराविक उद्योजकांचे हित साधणे आहे.