शिर्डीत सोन्याच्या दागिन्यांसह सराफ व्यापाऱ्याला लुटणारा ड्रायव्हर गुजरातमध्ये जेरबंद!
काय आहे नेमकी घटना?


शिर्डी
– तीन महिन्यांपूर्वी शिर्डीत घडलेल्या एका मोठ्या लुटीच्या प्रकरणात अहमदनगर (अहिल्यानगर) क्राईम ब्रँचने
गुजरातमधून आरोपीला अटक करत शिर्डीत चर्चेचा विषय ठरवला आहे.
काय आहे नेमकी घटना?
१३ मे २०२५ रोजी राजस्थानचा सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (३४, रा. चौहटन, जि. बारमेर) हा एका सराफ व्यापाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून शिर्डीत आला होता. व्यापारी विजयसिंह बसनाजी खिशी (रा. गुजरात) यांच्यासोबत हॉटेल साई सुनिता येथे मुक्काम करताना या ड्रायव्हरने ३ लाख २६ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम – एकूण २,६८७ ग्रॅम सोने दागिने घेऊन गायब झाला! 

या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नं. ५३२/२०२५, बीएनएस कलम ३०६, ३१६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
क्राईम ब्रँचची जबरदस्त कारवाई!
एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पोउपनि अनंत सालगुडे, अमृत आढाव, भगवान थोरात, प्रशांत राठोड यांच्या टीमने विशेष तपास मोहिम राबवली. पोलिसांनी इंटेलिजन्स व व्यवसायिक कौशल्याचा वापर करत आरोपीचा ठावठिकाणा मिळवला.
गुजरातमधील तलोड (जि. सावरकाठा) येथून आरोपीला पकडण्यात आलं आणि त्याला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सध्या पुढील तपास सुरू असून, लुटलेले दागिने व पैसे परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांचा इशारा
शिर्डी सारख्या पवित्र व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात अशा घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. पोलिसांनी व्यापाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मेट्रो पोर्टलचा व्हायरल अपडेट:
शिर्डीत ३ लाख २६ हजारांची लूट 
राजस्थानचा ड्रायव्हर आरोपी ठरला 
गुजरातमध्ये पोलिसांची मोठी कारवाई 
आरोपी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू 
अशा आणखी क्राईम अपडेट्ससाठी मेट्रो पोर्टल सोबत राहा!
#Shirdi #CrimeNews #GoldRobbery #MaharashtraPolice #BreakingNews 