Illegal Sand Mafia वर जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक!
कारवाई करत रेती माफियाला थेट टार्गेट केले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात अवैध रेती उत्खननावर महसूल विभागाने कडक कारवाई करत रेती माफियाला थेट टार्गेट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्पष्ट आदेशांनंतर जिल्हा प्रशासनाने मोहीम जोरात सुरू केली आहे.
“अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कोणत्याही दबावाखाली न येता कठोर कारवाई करा!” या शब्दांनंतर महसूल विभागाने थेट एक्शन मोडमध्ये प्रवेश केला.
प्रशासन आता एमपीडीए कायद्याअंतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत आहे. मात्र, महसूल विभाग धडाकेबाज कारवाया करत असताना पोलिस व परिवहन विभागावर निष्क्रियतेचे आरोप होत आहेत. नागरिकांचा आरोप आहे की, “पोलिस केवळ पाहुणे ठरलेत आणि परिवहन विभाग वसुलीपुरता मर्यादित आहे!”
१४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव यांच्यासह मंडपगाव आणि सुलतानपूर परिसरात अचानक धडक तपासणी केली. या ठिकाणी प्रचंड रेतीचे साठे उघड झाले
. लगेचच सहा जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
या कारवाईत आरोपी ठरलेले नावे:
- संतोष तेजराव डोईफोडे
- राजेंद्र येडोबा खंडागळे
- दत्तू मधुकर डोंगरे
- भानुदास प्रल्हाद खंडागळे
- मंगेश साहेबराव जायभाये (अंढेरा)
- टि. एकनाथ देशमुख
महसूल अधिकारी संजय हांडे व मंडळाधिकारी विजय हिरवे यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे.
गेल्या काही वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या नव्हत्या, पण महसूल विभागाने अलीकडच्या काळात माफियावर जबरदस्त दबाव टाकला आहे. तरीसुद्धा राजकीय दबावामुळे या कारवाया थांबतील का? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
गावपातळीवर अनेकांनी अवैध रेती विक्रीचा धंदा उघडपणे सुरू केला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.
नागरिकांची एकच मागणी – “रेती माफियाविरोधात अशीच कारवाई सुरू राहिली पाहिजे!”
#Bulldhana #SandMafia #BreakingNews #MetroPortal #IllegalMining #RevenueDepartment #ActionMode