मंचरचा गोविंदा पथक ठरला पहिला विजेता! 

 १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस पटकावत दहीहंडी फोडण्याचा मान 

🎉
 मंचरचा गोविंदा पथक ठरला पहिला विजेता! 🚩

👉 १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस पटकावत दहीहंडी फोडण्याचा मान 🥳
👉 शिर्डीच्या गोविंदा पथकाला मिळाला द्वितीय क्रमांक व २१ हजारांचे पारितोषिक

संगमनेर | गोकुळाष्टमीच्या जल्लोषात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल संगमनेर प्रखंडाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव धमाकेदार पार पडला 🚩.

३५ फूट उंचीवर सजवलेल्या दहीहंडीला मंचरच्या गोविंदा पथकाने पहिल्यांदा फोडून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह आपल्या नावावर केले. तर शिर्डीच्या गोविंदा पथकाने द्वितीय क्रमांक पटकावत २१ हजार रुपयांचे बक्षीस व स्मृतिचिन्ह मिळवले 👏.

🏆 बक्षीस वितरण खास अमोल खताळ यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासह नीलम खताळ, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, सरपंच संदीप देशमुख आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

🎶 पावसाच्या हलक्या सरी झेलत तरुणाई डीजेच्या ठेक्यावर थिरकत होती, तर लहानग्या बालगोपाळांनी कृष्ण-राधेच्या वेशभूषेत सगळ्यांची मने जिंकली ❤️.

 

✨ आकर्षक लाईट्स, डेकोरेशन आणि जल्लोषी वातावरणामुळे संपूर्ण संगमनेर शहर गोकुळाष्टमीच्या उत्सवात रंगून गेले.