“नगरचा अभिमान! भाई सथ्था नाईट हायस्कूल राज्यात अव्वल – 10 वी बोर्डमध्ये चार विद्यार्थ्यांनी चमक दाखवली ”
नगरच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलने पुन्हा एकदा इतिहास रचला! शाळेबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या हिंद सेवा मंडळाच्या या रात्रशाळेने राज्यात सर्वाधिक विद्यार्थी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी प्रवेशित केले.
“नगरचा अभिमान! भाई सथ्था नाईट हायस्कूल राज्यात अव्वल – 10 वी बोर्डमध्ये चार विद्यार्थ्यांनी चमक दाखवली 
”
नगरच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलने पुन्हा एकदा इतिहास रचला! 
शाळेबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या हिंद सेवा मंडळाच्या या रात्रशाळेने राज्यात सर्वाधिक विद्यार्थी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी प्रवेशित केले.
त्यातले चार विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले, ज्यामुळे राज्यभरातील सर्व रात्रशाळांमध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूलने पहिला क्रमांक पटकावला. 
मासूम संस्थेकडून करण्यात आलेल्या परीक्षणात ही शाळा राज्यात अव्वल ठरली आणि सन्मानाने गौरवली गेली.
राज्याच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची यादी:
- दीक्षा रमेश गवळी – प्रथम क्रमांक, समाजशास्त्र 95/100
![✨]()
- मंदा भाऊसाहेब भोराडे – पाचवा क्रमांक
- इशिता विक्रम भोर – आठवा क्रमांक
- जयश्री जगन्नाथ वैरागर
दीक्षा गवळीच्या यशामुळे त्यांचे विषय शिक्षक गजेंद्र गाडगीळ यांनाही विशेष सन्मान मिळाला.
सन्मान सोहळा हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
उपस्थित मान्यवरांमध्ये संस्थेच्या उपाध्यक्षा संगीता ॲबट, पेमराज सारडा कॉलेजचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, शाळेच्या चेअरपर्सन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी, शालेय समिती सदस्य आणि प्राचार्य सुनिल सुसरे यांचा समावेश होता.
प्राचार्य सुनिल सुसरे म्हणाले, “मागील 73 वर्षांपासून भाई सथ्था नाईट हायस्कूल आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विवाहित किंवा दिवसा शाळेत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. मासूम संस्था यासाठी पाठबळ देत आहे आणि हा सन्मान आमच्यासाठी खास आहे.”
डॉ. पारस कोठारी म्हणाले, “हे यश शिक्षकांच्या मेहनतीचे व विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे फलित आहे. आता शाळेची जबाबदारी आणखी वाढली आहे.”
प्रा. ज्योतीताई कुलकर्णी म्हणाल्या, “काम करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जिद्द खरोखर प्रेरणादायी आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत मिळवलेले यश अत्यंत कौतुकास्पद आहे.”
अजितशेठ बोरा यांनी सांगितले, “सामान्य घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे शाळेचे सातत्याचे कार्य आहे. मासूम संस्थेचे पाठबळ त्यांना नवी ऊर्जा देत राहील.”
विद्यार्थिनी मंदा भोराडे म्हणाली, “27 वर्षांनंतर पुन्हा प्रवेश घेऊन मिळवलेले यश खूप आनंददायक आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव राऊत, आभार बाळू गोरडे यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलालजी सारडा, माजी कार्याध्यक्ष अनंत फडणीस, आणि मासूम संस्थेच्या CEO निकिता केतकर यांनी शाळेच्या या यशाबद्दल अभिनंदन केले. 