आरोग्य व्यवस्था धोक्यात!
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी-कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर “मागण्या मान्य होईपर्यंत काम बंदच!”
आरोग्य व्यवस्था धोक्यात!
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी-कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर 
“मागण्या मान्य होईपर्यंत काम बंदच!”
अहिल्यानगर | पोलीस न्यूज नेटवर्क
जिल्हा रुग्णालयासह संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत काम करणारे कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनात उतरले आहेत.
आंदोलनामागील कारणं
- २००५ पासून कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजूनही नियमित सेवा मिळालेली नाही
![😡]()
- शासनाने १४ मार्च २०२४ ला समायोजनाचा निर्णय घेतला, पण अंमलबजावणी अजून नाही
![⏳]()
- तुटपुंज्या मानधनावर काम, EPF, बोनस, ग्रॅज्युटी अशा मूलभूत सोयींचा अभाव
![💰]()
- सेवेत असताना मृत्यू किंवा अपघात झाल्यास सानुग्रह अनुदानाची मागणी
![💉]()
कर्मचाऱ्यांच्या ठाम मागण्या
- दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्यांना कायम करण्यात यावं
- वेतनात २५% वाढ
![💸]()
- अपघात/मृत्यूवर ५० लाख सानुग्रह अनुदान, अपंगत्वावर २५ लाख
![🆘]()
- सर्वांना EPF आणि गटविमा लागू करावा
![🛡️]()
- तात्काळ रिक्त पदांची जाहिरात करून समायोजन करावं
कर्मचारी संघटनांचा इशारा – “मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही!”
पार्श्वभूमी
१०-११ जुलैला आझाद मैदानावर आंदोलन, आरोग्यमंत्री भेटले तरी तोडगा नाही.
आता १९ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचा संप सुरू.

आंदोलनामागील कारणं



कर्मचाऱ्यांच्या ठाम मागण्या


पार्श्वभूमी