
BIG BREAKING | अखेर पोलीस भरतीचा जीआर जाहीर!
पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो तरुण-तरुणींसाठी आजचा दिवस Historic Moment!
राज्य शासनाने 15,631 पदांसाठी मेगा पोलीस भरती जाहीर केली आहे. 

कोणत्या पदांसाठी भरती?
या जीआरनुसार एकूण 15,631 रिक्त पदे भरली जाणार आहेत :
पोलीस शिपाई – 12,399 पदे
शिपाई चालक – 234 पदे
बॅण्डस्मॅन – 25 पदे
सशस्त्र पोलीस शिपाई – 2,393 पदे
कारागृह शिपाई – 580 पदे
कालावधी
1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024
1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025
या कालावधीत रिक्त झालेल्या व रिक्त होणाऱ्या सर्व पदांसाठी ही पदभरती केली जाणार आहे.
परीक्षा व प्रक्रिया
- ही भरती घटकस्तरावरून राबविण्यात येणार आहे.
- परीक्षा OMR आधारीत लेखी पद्धतीने होईल.
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग
₹450 - मागास प्रवर्ग
₹350
- खुला प्रवर्ग
उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण!
गेल्या काही काळापासून पोलीस भरती रखडल्याने उमेदवारांमध्ये नाराजी होती. पण आज अखेर शासनाने हिरवा कंदील दाखवून हजारोंना मोठा दिलासा दिला आहे. 
पोलीस दलात भरती होणं म्हणजे केवळ नोकरी नाही, तर देशसेवेची संधी. यामुळे तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 
तुमचं मत काय?
- पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी हा निर्णय किती महत्वाचा आहे?
- OMR आधारित परीक्षा ही योग्य पद्धत आहे का?
तुमचा रिअॅक्शन कमेंटमध्ये नक्की द्या!
#PoliceBharati #BreakingNews #MetroPortal #CareerUpdate #MaharashtraPolice 

कोणत्या पदांसाठी भरती?
शिपाई चालक – 234 पदे
बॅण्डस्मॅन – 25 पदे
सशस्त्र पोलीस शिपाई – 2,393 पदे
कारागृह शिपाई – 580 पदे
कालावधी
परीक्षा शुल्क:
उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण!
तुमचं मत काय?