रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलकडून समाजोपयोगी उपक्रम – सायकली, शिवणयंत्रे, वेंडिंग मशिन्स आणि इंसीनरेटरचे वाटप!
अहिल्यानगरात रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल ने पुन्हा एकदा “सेवा हेच सर्वोच्च” या ब्रीदाला न्याय दिला आहे.
Share
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलकडून समाजोपयोगी उपक्रम – सायकली, शिवणयंत्रे, वेंडिंग मशिन्स आणि इंसीनरेटरचे वाटप!
अहिल्यानगरात रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल ने पुन्हा एकदा “सेवा हेच सर्वोच्च” या ब्रीदाला न्याय दिला आहे. बडीसाजन हॉलमध्ये आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत महिलांना ११ सायकली , ११ शिवणयंत्रे , ११ वेंडिंग मशिन्स आणि ११ इंसीनरेटर वाटप करण्यात आले.
या प्रकल्पामुळे विशेषतः महिलांना स्वावलंबी होण्याची नवी दिशा मिळाली असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे.
उपस्थित मान्यवरांची प्रेरणादायी वचने
क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुनील कटारिया यांनी प्रास्ताविक करताना या उपक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला.
सहायक प्रांतपाल मधुरा झावरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले, तर जिल्हा फर्स्ट लेडी संगीता लातुरे यांनी महिलांसाठी करण्यात आलेल्या कामाचे विशेष अभिनंदन केले .
मुख्य अतिथी जिल्हा प्रांतपाल रोटेरियन सुधीर लातुरे यांनी क्लबच्या उपक्रमाचे कौतुक करत सर्व रोटरी क्लब्स व दात्यांनी रोटरी फाउंडेशनसाठी उदारतेने दान करावे असे आवाहन केले.
संस्थांचे योगदान
या प्रकल्पासाठी सी.बी. छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, रिसन्स इंडस्ट्रीज MIDC अहिल्यानगर, रमेश फिरोदिया चॅरिटेबल ट्रस्ट नगर, संगिता चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि आर.एन. धाडीवाल कल्याणी नगर पुणे यांनी मोलाचे योगदान दिले.
अवयव दान जनजागृती
या कार्यक्रमात सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा समन्वयक सतीश अहिरे यांनी सर्वांना अवयव दान शपथ दिली. “अवयव दान हेच दान श्रेष्ठ” असा संदेश उपस्थितांमध्ये पोहोचवण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्यात जिल्हा प्रांतपाल रो. सुधीर लातुरे, जिल्हा फर्स्ट लेडी सौ. संगीता लातुरे, सहायक प्रांतपाल रो. मधुरा झावरे, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शिरीष रायते, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नोमिनी रो. क्षितिज झावरे, रो. प्रमोद पारीख यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, क्लब सदस्य, विविध शाळांचे प्रतिनिधी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्रदर्शन क्लबचे सचिव रो. अमर गुरप यांनी मानले.
समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचा हा उपक्रम केवळ वाटपापुरता मर्यादित नसून – महिला सक्षमीकरण, पर्यावरणपूरक उपाय, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या सगळ्यांचा संगम आहे.
हा उपक्रम खरंच “सेवा हेच सर्वोच्च” या विचाराचा उत्तम प्रत्यय देणारा ठरला आहे.