अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा दिवसाढवळ्या गुन्हेगारांनी दहशत माजवली आहे. केडगावच्या लिंक रोडवर, कारमेल हायस्कूलजवळ २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वाजता शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून चोरटा पळाल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी अर्चना संतोष चौधरी (वय ४९, रा. जिजामाता कॉलनी, भुषणनगर, केडगाव) या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून शाळेत जात होत्या. तेवढ्यात मागून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर हेल्मेट घालून आलेल्या चोरट्याने अचानक झडप घातली!
चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण चौधरी मॅडम यांनी तात्काळ धैर्य दाखवत मंगळसुत्र घट्ट पकडले. त्यामुळे मंगळसुत्र दोन तुकड्यात फाटले – त्यातील अर्धा भाग (किंमत अंदाजे ₹२५,०००) चोरट्याच्या हाती लागला आणि तो भरधाव गाडीने पसार झाला.
घटनेनंतर चौधरी यांनी थेट कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३०९ (४) अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी १० वाजता शाळा-कॉलेज जाण्याच्या वेळेला एवढ्या धाडसाने चोरी होणे म्हणजे परिसराच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, लिंक रोड परिसरात सतत गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि गुन्हेगारांना तातडीने पकडून कठोर शिक्षा द्यावी.
लक्षात ठेवा मित्रांनो – गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहा मौल्यवान दागिने उघडपणे न घालणे अडचण आल्यास त्वरित १०० वर फोन करा
Metro News चा प्रश्न “हे चोरटे एवढे बिनधास्त कसे? ” नागरिकांचे एकच म्हणणे – “आता पोलिसांनी ॲक्शन दाखवलीच पाहिजे!”