पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई

पुण्यात १७ गुन्हे करणारे इराणी चोर अटकेत

पुणे : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोन सराईत इराणी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे 17 गुन्हे उघडकीस आले आहेत. हे चोरटे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेत होते. सफिर फिरोज खान वय 35, रा. दत्तवाडी सिंहगड कॉलेजरोड, लोणावळा पुणे), मोहम्मद उर्फ डॉन शाबुद्दीन इराणी (वय 25, रा. शिवाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Also see this and subscribe 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार आशिक बोटके, निशांत काळे व प्रदीप गोडांबे यांना माहिती मिळाली की, चेन चोरी करणारे दोन चोरटे एका काळ्या रंगाच्या नंबर नसलेल्या अपाची मोटार सायकलवरुन देहूफाट्याकडून मोशीच्या दिशेने येत आहेत. पिंपरी चिंचवड त्यानुसार पोलिसांनी डुडुळगाव येथे सापळा लावला आणि साफिर आणि मोहम्मद यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास करत असताना पोलिसांनी 11 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 1 लाख 65 हजारांच्या दोन दुचाकी असा एकूण 12 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.