अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा चीनी ‘टिकटॉक’ला देणार टक्कर
भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अॅपची करणार निर्मिती
मुंबई :
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने पबजी प्रेमींसाठी पर्याय म्हणून भारतीय
‘फौ-जी’ तयार करणार असल्याचे म्हटले होते. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा आणि तिचा नवरा राज कुंद्रा हे देखील टिकटॉकला टक्कर देणाऱ्या भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अॅपची निर्मिती करत असल्याचे वृत्त आहे.
स्वतः राज कुंद्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ‘जेएल स्ट्रीम हे अनेक वैशिष्ट्यांसह बनविलेले भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अॅप आहे. काही चिनी अॅप्स भारतात बंदी असूनही सर्व्हर सुरू ठेवून आणि मिकोचे मिका असे नाव बदल करून सर्रास भारतात वापरले जात आहेत.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा याचे हे नवे अॅप www.jlstream.com वर चीन वगळता संपूर्ण जगभरात उपलब्ध होणार आहे.