मायावतींचा भाजपला पाठिंबा देण्यास नकार   

एकवेळ संन्यास घेईन, पण कधीही भाजपसोबत जाणार नाही

लखनऊ :
भविष्यात मायावती भाजपला पाठिंबा देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.  मात्र, मायावती यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.  एकवेळ आम्ही सन्यास घेऊ पण कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे मायावती यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ७ जागांवर मंगळवारी होणाऱ्या मतदानाच्या एक दिवस आधी मायावती यांनी भाजपला मिळालेल्या असल्याच्या आरोपाचे खंडन केले.  आपल्या पक्षाची विचारधारा ही भाजपच्या अगदी उलट आहे.  भविष्यात विधानसभा किंवा लोकसभेच्या निवणुकीत बसप भाजपसोबत कधीही आघाडी करणार नाही, असे मायावती म्हणाल्यात.
बसप जातीयवादी, धर्मवादी, भांडवलदारधार्जीणी विचारधारा असलेल्या पक्षासोबत कधीही आघाडी करणार नाही.  एकवेळ आम्ही राजकीय सन्यास घेऊ, पण अशा पक्षाच्या सोबत कधीही जाणार नाही, असे मायावती म्हणाल्या.  अशा पक्षाविरोधात आपण सदैव लढणार असून त्यांच्यासमोर कधीही झुकणार नसल्याचेही त्या म्हणाल्यात .