लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नुतन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी डॉ. अमित बडवे, सचिवपदी सुनील छाजेड तर खजिनदारपदी विपुल शाह यांची निवड

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नुतन कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अमित बडवे, सचिवपदी सुनील छाजेड तर खजिनदारपदी विपुल शाह यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

लायन्स क्लब ही जागतिक दर्जाची असलेली सेवाभावी संस्था आहे. क्लबचे 210 देशामध्ये 15 लाख सभासदांच्या माध्यामातून सामाजिक कार्य चालू आहे. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने शहरात नेत्रदान, रक्तदान व वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन, समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आनण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. नुकतेच लायन्सच्या सदस्यांनी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात शहरात सुरु करण्यात आलेल्या घर घर लंगरसेवेत भरीव योगदान दिले. या संघटनेमार्फत शहरात गुरु अर्जुन देवजी नावाने दोन निशुल्क कोविड केअर सेंटर चालविण्यात आले. त्यातून सोळाशे रूग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. दरवर्षा प्रमाणे जूनमध्ये नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात येत असून, क्लबच्या माध्यमातून सामाजिक उद्दीष्ट समोर ठेऊन वर्षभर कार्य करणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अमित बडवे यांनी दिली.

 

 

 

डॉ. बडवे यांची सलग दुसर्‍या वर्षी क्लबच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. बडवे अस्थिरोग तज्ञ असून, श्रीदीप हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांची सेवा सुरु  आहे. गरजू रुग्णांसाठी विविध शिबीर घेऊन ते मोफत सेवा देत असतात. सचिव सुनील छाजेड मागील बारा वर्षापासून लायन्स क्लब माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे. ते पॉलिमर इंजीनियर असून, त्यांचा शहरात देवीचंद पूनमचंद छाजेड या नावाने होलसेल किराणा, सुका मेवा, गुलाल आणि डीस्पोजेबलचा व्यापार आहे. खजिनदार विपुल शाह हे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा शेती औजारे आणि मशीनरीचे जय भारत मशिनरी हे दुकान आहे. ते स्थानिक रेल्वे सलागार समिती सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत. सामाजिक कार्यासाठी लायन्सला ते जोडले गेले असून, विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. या नुतन पदाधिकार्‍यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.