डॉक्टर व पोलीस ह्या दोघांनाही राखी बांधली नाही तरी ते आपले रक्षण करतातच.

डॉक्टर - पोलीस रक्षाबंधन उत्सव केला साजरा

प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)

 

                      डॉक्टर व पोलीस ह्या दोघांनाही राखी बांधली नाही तरी ते आपले रक्षण करतातच.
                      डॉक्टर आजारांपासून रक्षण करतात तर पोलीस शत्रूंपासून सदैव आपले संरक्षण करतात…

 

 

                    हेच डॉक्टर व पोलीस मधील ऐक्य लक्षात घेऊन आज स्वराज्य वैद्यकीय संघाने समर्थ पोलीस स्टेशन , पुणे येथे डॉक्टर – पोलीस रक्षाबंधन उत्सव साजरा केला.
                       टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व समर्थ पोलीस स्टेशन मधील पोलीस बंधू- भगिनी  मोठ्या उत्साहात साजरा झाले होते.

 

 

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

 

                    मोठ्या आनंदात हा छोटेखानी कार्यक्रम  पार पडला.
                   पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.