मंत्री राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना आक्रमक

राणेंना भाजप संपवायला घेतलंय कि शिवसेना संपवायला - बोराटे

प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्या नंतर त्याचे पडसाद शिवसेनेकडून नगर मध्ये उमटलेत. कोतवाली पोलीस ठाण्यात राणेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला नंतर शिवसेनेतर्फे  आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर शिवसैनिकांनी गांधी मैदानातील शहर भाजप कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी केली. नगर शहर शिवसेनेच्या वतीने कोंबडी चोर नारायण राणे  याच्या पुतळ्याला भाजप कार्यालय समोर चपलाने जोड्या मारून जाळण्यात आले .

 

 

 

 

 

 

यावेळी शिवसेनेचे शिवसेना शहर प्रमुख दिलीप दादा सातपुते , युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम अनिलभैय्या राठोड , उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे,  संजय शेंडगे, दत्ता जाधव, गणेश कवडे, अभिषेक कळमकर, संभाजी कदम, दत्ता खरे, संग्राम शेळके, संग्राम कोतकर, संतोष ज्ञानअप्पा, आप्पा नळकांडे,सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, महिला आघाडीचे स्मिताताई अष्टेकर, आशाताई निंबाळकर, अरुणाताई गोयल सर्व शिवसेना नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

 

 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर मी असतो तर कानशिलात मारली असती.  असे जहाल वक्तव्य राणेंनी केल्यानंतर  शिवसेना आक्रमक झाली असून राज्यात राणे यांच्याविरोधात शिवसेनेच्या युवा शाखेकडून ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने अहमदनगर मधे शिवसेने कडून तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  स्वातंत्रदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात काहीशी झालेल्या गफलतीवर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी अशा चुकीबद्दल मी कानशिलात लगावली असती, देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली, स्वातंत्रदिनाचे हे अमृतवर्षं आहे की हिरक वर्षे आहे हे ठाकरे यांना माहिती नाहीत, मी असतो तर कानशिलात लगावली असती असे वक्तव्य नारायण राणे यांनी महाड मध्ये पत्रकारपरिषदेत केले होते. राणें कडून असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांबाबत आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

या चोट्या नारायण ला आम्ही नगरमध्ये पाऊल  ठेवू देणार नाही, असे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी सांगितले.  नारायण राणेंना भाजप संपवायला घेतलंय कि शिवसेना संपवायला घेतलय हेच समजत नाहीय, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दिली. नारायण राणेंनी ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात घाण केलीय. या गोष्टीची शिक्षा त्यांना मिळणार आहे. शिवसैनिक राणेंचे महाराष्ट्रात चालणे मुश्किल करतील अशी संतप्त प्रतिक्रिया स्मिता अष्टेकर  यांनी दिलीय. नारायण राणे शिवसेनेत होते म्हणूनच त्यांना मंत्रिपद मिळालेय हे ते विसरतायेत, असे उद्गार माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी काढले.