महापालिका आवारातच कचऱ्याचे साम्राज्य 

शहरासह उपनगर धोक्यात

अहमदनगर, 

 

सावेडी,  उपनगरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून घंटा गाड्या बंद झाल्या असून नवरात्रोत्सवाच्या काळात रस्त्यावर कचऱ्यांचे ढीग झाले.  घंटागाडी कचरा टाकणारे नागरिक कचरा गोळा करून घंटागाडी ची वाट पाहत आहे.  पण गाड्या बंद झाल्याने कचरा कुठे टाकणार ? हा प्रश्न आहे.  उपनगरात अशी अवस्था असल्याने माजी नगरसेवक निखिल वारे,  बाळासाहेब पवार यांनी मनपा आयुक्तांना जाब विचारण्यासाठी कार्यालयात आले असता,  महापालिका आवारातच कचऱ्याचा दिसला.  याबाबत संतप्त निखिल वारे आणि बाळासाहेब पवार यांनी आयुक्त शंकर गोरे यांना वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी बाहेर चला असं सुचवले.  तेव्हा त्यांना परिस्थितीची जाणीव झाली.  महापालिका इमारतीजवळ च  ही परिस्थिती आहे , तर सावेडी  उपनगरात काय अवस्था असेल हे त्यांनी बोलून दाखवलं.

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

 

याबाबत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारावा अशी मागणी वारे आणि पवार यांनी मनपा आयुक्तांकडे केली.  शहरातील खड्ड्यांचा विषय गाजत असताना कचरा आणि स्वच्छतेचा प्रश्‍न वारे आणि पवार यांनी आज लावून धरला.  याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.  आयुक्त गोरे यांनी याबाबत चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली.  तसेच आरोग्य अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून माहिती घेऊन , सावेडी उपनगरात तात्काळ घंटागाड्या सुरू करण्याचा आदेश देतो. असे स्पष्ट केले.  नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही संतप्त होतो म्हणजे आमचा अधिकाऱ्यांवर राग आहे असं नसतं.  पण काम करताना अधिकारी जबाबदारी झटकत आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे हे क्रमप्राप्त आहे.  अशी प्रतिक्रिया निखिल वारे यांनी दिली .