नगर अर्बन बँक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध करणे बँकेच्या हिताचे

राजेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखालील पॅनल ने घेतली खासदारांची भेट

अहमदनगर

(संस्कृती रासने प्रतिनिधी)

एस टी मधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आजपासून एस टी महामंडळातील संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर बेमुदत उपोषण सुरु केलंय. त्यानुसार आज नगरमध्ये विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आलंय. कोविद १९ च्या काळात एस टी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून अविरत सेवा केली. त्यातच ३०६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि जवळपास राज्यातील ३० कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केली.

 

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

 

यावेळी  कामगार सेना सचिव नितीन येणे, यांनी कोरोना काळात एस टी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेविषयी माहिती दिली.   इतके होऊनही एस टी कर्मचारी दुर्लक्षित राहिलाय. या कारणास्तव नाईलाजाने कर्मचाऱ्यांना उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला.   महामंडळाच्या सर्जेपुरा मधील विभागीय कार्यालयासमोर कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. आमच्या हक्काच्या गोष्टी मागण्यासाठी आम्हाला उपोषणाला बसावे लागतेय ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, असे डी जी अकोलकर म्हणाले.

 

 

एस टी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, तसेच अग्रीम उचल लागू करण्यात यावी. दिवाळी भेट तसेच मासिक वेतन नियोजित तारखेस व्हावे अशा विविध मागण्यासांठी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कडूस, सचिव डी जी अकोलकर, कामगार सेना सचिव नितीन येणे,   कामगार सेना विभागीय अध्यक्ष गणेश फाटक, इंटक चे विभागीय अध्यक्ष दिनकर लिपणे,  सचिव सुरेश चौधरी, काष्ट्राइब संघटनेचे विभागीय अध्यक्ष  आणि सचिव सुलाखे आणि शशिकांत वाकचौरे, कोषाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष उत्तम रणशिंग, रोहिदास  अडसूळ तसेच राष्ट्रीय एस टी कामगार काँग्रेस चे विभागीय अध्यक्ष आणि सचिव संजय मिसाळ, आणि विष्णू घुले, सुरेश क्षीरसागर, एसटी कामगार सेना उपाध्यक्ष  रमेश सानप, सेवानिवृत्त संघटना  जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे आदी उपोषणाला बसले आहेत. सरकारी कार्यालयात कागदपत्रांची अफरातफर झाल्यामुळे पेन्शन योजना सुरु होऊनही पेन्शन सुरु झाली नाहीय. तो प्रश्न सोडवण्यासाठी ही उपरोक्त संघटनांनी पाठिंबा दर्शवला असल्याचे बलभीम कुबडे यांनी सांगितले.