बेकायदेशीर बांधकामा बाबत वारंवार तक्रार अर्ज करून महापालिकेचे दुर्लक्ष

अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊन त्वरित बांधकाम पाडण्यासाठी महानगरपालिकेसमोर अमरण उपोषण करताना वैभव जाधव समवेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवान जगताप, नंदू भिंगारदिवे, दीपक पवार, बबलू भिंगारदिवे, कृषी पाटोळे, मनोज साठे, सिद्धार्थ पाटोळे, संजय डहाळे, बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, उमाशंकर यादव, राजू शिंदे, राजू भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मौजे सावेडी मधील जुना सर्वे नंबर 13 14 नवीन सर्वे नंबर 17 16 299/1 फायनल प्लॉट नंबर 121, 122 क 299/2,299/1 नवीन सर्वे नंबर 329 पै. यामध्ये अनधिकृत ऑफिसचे बांधकाम करणारे नामे राजकुमार नवंलमल गांधी व इतर लोकांनी येथे बांधकाम करत आहे तरी हे अनाधिकृत बांधकाम पाडण्यात यावे. अतिक्रमण विभाग प्रमुख यांना मौजे सहावी मधील अनधिकृत बांधकाम पाण्याबाबत अर्ज दिलेला होता परंतु सदर विभाग प्रमुख यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणत्याही स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही सदर मिळकतीबाबत न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे सदर मिळकतीबाबत परवानगी घेतल्या नाही अथवा परवानगी मागणी केलेली दिसून येत नाही सदर अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे या मागणीसाठी महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात आले आहे.