नगरमध्ये उद्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव

पद्मश्री पोपटराव पवार हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची उपस्थिती

अहमदनगर येथील रंगभूमी मीडिया अँड एंटरटेनमेंट अहमदनगर, महानगरपालिका आणि न्यू आर्ट्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरा राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव उद्या 9 जून रोजी न्यू आर्ट्स महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असून यावेळी महोत्सवात सहभागी लघुपट्यांचा पद्मश्री पवार यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. सकाळी लघुपट व माहितीपटांचे स्क्रीनिंग व त्यानंतर दुपारी पारितोषिक वितरण होईल. याशिवाय दरवर्षीप्रमाणे पर्यावरण विषयक एका विशेष माहितीपटाचे स्क्रीनिंग व दिग्दर्शकांशी चर्चा असा कार्यक्रम असेल. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून समस्त पर्यावरण प्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सीईओ कृष्णा बेलगावकर यांनी केले आहे. दरम्यान या महोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव यांच्यासह पर्यावरण व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. दत्तात्रय वने, सचिन ठुबे, सूर्यकांत नेटके आणि राहुल रसाळ यांनाही पद्मश्री पवार यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.