AHMEDNAGAR POLICE : ACTION MODE ON

जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम

अहमदनगर – जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम आहे. गेल्या काही दिवसात बिंगो, दारू जुगाराच्या १६ धंद्यांवर छापे टाकले आहेत. या छापेमारीत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांची झोप उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी पोलीस ठाण्यांना भेटी देऊन केलेल्या कारवायांचा आढावा घेतला आहे. पोलीस ठाण्यांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश ही दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात नगर शहर, श्रीगोंदा, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील ऑनलाईन बिंगो, हातभट्टीची दारू, देशी-विदेशी दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकत २ लाख ४३ हजारांचा ऐवज जप्त केला असुन, अवैध व्यवसाय करणाऱ्या 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विविध पोलीस ठाण्यात १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेली ही मोहीम अद्याप सुरू असून सोमवारी अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी-विदेशी दारूसह गावठी हातभट्टीची तयार दारू, रसायन व ऑनलाईन बिंगो चे साहित्य असा एकूण २ लाख ४३ हजार २७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. किशन संजय कांबळे (रा,सोळातोटी कारंजा), नितीन राजान्ना भिंगारे (रा.राज चेंबरमागे, मंगल गेट), राजेंद्र विलास पवार (रा.खातगाव टाकळी ता.नगर), वर्षा रमेश गुंजाळ (रा.लिंबगाव ता.श्रीगोंदा), मयूर दिलीप कांबळे (रा.श्रीगोंदा कारखाना), व्यंकटेश रामचरण सोनकरीवार  (रा.श्रीगोंदा कारखाना), ऋषिकेश शरद राक्षे (रा.गव्हाणवाडी ता.श्रीगोंदा), राधेशाम शिवशंकर तिवारी (रा.देवदैठण ता.श्रीगोंदा) बिराजदार धोंडीबा कऱ्हाडे (रा.गव्हाणवाडी ता.श्रीगोंदा), इमरान अब्दुल रहीम शेख, युनूस चांद शेख, (रा.कुकाना, ता.नेवासा), उत्तम दौलत कोल्हे (रा.शहर टाकळी ता.शेवगाव) संदीप भाऊसाहेब मोरे (रा.बक्तरपुर ता.शेवगाव), रामेश्वर भरतरी नजन, सुरेश लक्ष्मण नजन, भरत बाबासाहेब चोपडे, (तिघे रा. भातकुडगाव ता.शेवगाव) गणेश विष्णू आंधळे (रा.सोनसांगवी ता.शेवगाव), शौकत दिलदार शेख (रा.राक्षी ता.शेवगाव), ऋषिकेश उद्धव पातकळ (रा.चापडगाव ता.शेवगाव), ज्ञानेश्वर अन्ना उरुणकर (रा.मिरी ता.पाथर्डी), राजू जनार्दन सातपुते (रा.साकेगाव ता.शेवगाव), गणेश आबासाहेब कराळे (रा.कामत शिंगवे ता.पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.