काँग्रेसप्रणित आघाडीकडून लोकशाहीची गळचेपी सुरु 

रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर

नवी दिल्लीः  
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसप्रणित आघाडीकडून महाराष्ट्रात लोकशाहीची गळचेपी सुरू आहे, पुन्हा एकदा त्यांनी लाज आणल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करत आहे. तसेच हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे.
या कृत्यानं पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण करून दिली आहे. मुक्त प्रेसवरील हा   हल्ला असून त्याचा प्रतिकार केला जाईल, असंही अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.