राजधानी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट

ICU बेडसाठी 'आप' सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

नवी दिल्ली:
राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी सांगितलं आहे. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे 6 हजार 725 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे,त्यामुळे दिल्लीतील कोरोनारुग्णांची एकूण संख्या 4 लाख 3 हजार 96 वर जाऊन पोहोचली आहे. यापूर्वी 30 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये 5 हजार 891 नवे रुग्ण आढळून आले होते.
  कुणीही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह  आल्यास त्याच्या संपर्कातील सर्वांचीच चाचणी करत आहोत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचं जैन म्हणाले.
 कोणतीही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास त्याच्या संपर्कातील सर्वांचीच चाचणी करत आहोत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याचं जैन म्हणाले.