अनिल भैयांच्या पुण्याईचा उपयोग करून घ्या !
शिवसेना पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांचा निर्देश ; पुण्यात सदिच्छा भेटीदरम्यान नगविधानसभेसंदर्भात सूचक वक्तव्य
अहमदनगर : नगर शहर विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांनी भरीव असे काम केले आहे. त्यांच्या पुण्याईचा उपयोग आपल्याला आगामी निवडणुकीत निश्चितपणे होऊ शकतो याबाबत आपण शिवसेना (उबाठा)च्या विधानसभा जागे संदर्भात निर्णय घेण्यास सक्षम असलेल्या वरिष्ठांशी आपली चर्चा झाली असल्याचे, सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते शरदचंद्र पवार यांनी केले आहे.
पुणे येथे मोदी बागेत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी नगरसेवक विधानसभा मतदारसंघाच्या जागे संदर्भात सखोल चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश कानडे शिवसेना उभाठा गटाचे पुणे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यात एका कार्यक्रमा दरम्यान टिळक स्मारक येथे युवा सेना प्रदेश सहसचिव विक्रम राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उबाठा गट, गिरीश जाधव, मंदार मुळे यांची शरद पवार यांच्या समवेत भेट झाली. आपले शुभाशीर्वाद आम्हाला हवे आहेत असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले. त्यावेळी त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर मोदी बागेत भेटा असे निर्देश दिले. आमदार रवींद्र धंगेकर यावेळी त्यांच्या समवेत होते. नंतर या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ मोदी बाग गाठले. शरद पवार यांनी त्यावेळी पदाधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली, आणि नगर शहर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. आमदार अनिल राठोड यांनी या मतदारसंघात भरीव असे कार्य केलेले आहे. त्यांच्या अकाली जाण्यानंतर त्यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांची या मतदारसंघावर पकड आहे.
शिवसेना या भागात सक्षमपणे कार्यरत आहे. याविषयी समाधान व्यक्त केले. दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्या कार्यकर्तृत्चाचा आलेख मोठा असून त्यांचे विचार आणि वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवारालाच चांगली संधी आणि यश मिळेल याविषयी आपल्या मनात तीळमात्र शंका नाही. आपण सेनेच्या वरिष्ठांशी याबाबत सखोल चर्चा केली आहे. त्यांच्या पुण्याईचा उपयोग सेनेने करून घ्यावा आणि ही जागा निश्चितपणे जिंकण्याची संधी सोडू नये असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी राठोड, जाधव आणि मुळे यांनी पवार यांना दंडवत घालून चरण स्पर्श केला. पवार यांनी यशस्वी व्हा असा आशीर्वाद त्यांना दिला. या घटनेमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमधला हुरूप वाढला असून आमदार अनिल राठोड यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा ठाम निर्धार यावेळी सर्वांनी केला. मागील दोन टर्म निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी स्वार्थी कपटी राजकारण केले आणि निसटत्या फरकाने साहेब पडले याचा वाचवा या निवडणुकीत आपण निश्चितपणे काढू असे सर्वांनी म्हटले.