महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मारुती पवार यांचा आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत गौरव!

पतसंस्था क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान!

अहिल्यानगर – शिर्डी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मारुती पवार यांना पतसंस्था क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. सुधन गोल्ड लोनचे बिजनेस हेड विक्रांत सुत्रावे व हैदर पठाण यांनी पवार यांचा सत्कार केला. याप्रसंगी संचालक संजय मूनोत, पवन गुंदेचा, कर्मचारी विलास रासकर, सुनील पुरी उपस्थित होते. मारुती पवार हे 2011 पासून महेश नागरी पतसंस्थेचे संचालक आहेत आणि तीन वेळा व्हाईस चेअरमन पदाची त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ते योगदान देत आहेत. आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत पवार यांचा सन्मान झाल्याबद्दल महेश नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर, चेअरमन डॉ. अशोक चेंगेडे, व्हाईस चेअरमन शांतीलाल मुनोत, पतसंस्थेचे तसेच सर्व संचालक व कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.