सक्कर चौकातील सिग्नल चपलांच्या हाराने सन्मानित
टाळ्या वाजवत वाहतूक शाखेचा निषेध
नगरच्या जागरूक नागरिक मंचाच्या वतीने सक्कर चौकातल्या सिग्नलला चपलांचा हार घालून गांधीगिरी करण्यात आली. खरेतर नगरमधल्या रस्त्यांची अवस्था नांगरलेल्या शेतासारखी झाली आहे. रस्त्यांची परिस्थिती भयानक असल्यामुळे नगरकर जीव मुठीत धरूनच शहरात प्रवास करतात. त्यात शहराचे प्रवेशद्वार समजले जाणाऱ्या कायनेटिक चौक आणि सक्कर चौकातील सिग्नल बंद असतात त्यामुळे मिनिटं मिनिटाला वाहतुकीचा खोळंबा होतो. नगरची शहर वाहतूक शाखा संपूर्ण महिनाभर रास्ता सुरक्षा अभियान राबवून आपण कसे सोवळ्यात आहोत, हे दाखवत आहे. फोटोसेशन करुण वाहतूक शाखा स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे. पण राज्यातील बंद सुरु करण्याची तसदी घेत नाही. महापालिका रस्ते दुरुस्त करत नाही, आणि नगरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तर एस.टी स्टॅन्ड वर उभ्या असणाऱ्या प्रवासी वाहन चालकांकडून पावत्या फाडण्यात धन्यता मानतात. या परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागरूक नागरिक मंचाने या बंद पडलेल्या सिग्नलला जुन्या चपलांचा हार घालून सन्मानित केले.त्यासाठी मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुले हे सिग्नललं शिडी लावून चढले. वाहतूक शाखेचा निषेध करत मंचाच्या सदस्यांनी टाळ्या वाजवत या गांजलेल्या सिग्नलची स्थिती चौकातून जाणाऱ्या वाहनचालकांना दाखवली. हा चपलांचा हार घालून वाहतूक सुरक्षा सप्ताहात जर वाहतूक शाखेने पालिकेच्या सहकार्यांने जर सिग्नल चालू करून घेतले नाही तर प्रशासनाने आपली हार मानल्याचे कबूल केले असे च म्हणावे लागेल, असे सुहासभाई मुळे यांनी सांगितले. या कार्यक्रमास राज्यमुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, आणि मंचाचे उपाध्यक्ष प्रा. सुनील पंडित यांनीही आपले मत व्यक्त केले. पत्रकार प्रकाश भंडारी यांनी आपले विचार व्यक्त केले. पंडित दीनदयाळ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी ही या समस्येकडे लक्ष वेधले. यावेळी सक्कर उद्योगाचे मोहनशेठ लुल्ला, नगरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यायसायिक स्वीट होम समूहाचे संचालक धनेश बोगावात, मंचाचे सेक्रेटरी कैलास दळवी, मनसे चे नेते नितीन भुतारे, काँग्रेस पक्षाचे नेते आणि ओबीसी , व्हीजे , एनटी जनमोर्चा चे नगर शहर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, पैलवान भैरवनाथ खंडागळे, अभय गुंदेचा, सुनील पडोळे, प्रा. सुनील कुलकर्णी श्रीमती सांगळे, शारदा होशिंग आदी उपस्थित होते. पोलीस आणि प्रशासनाने या मंचाच्या गांधीगिरी ची दाखल घेतली नाही तर मंच वेगळ्यापद्धतीने त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला.