औरंगाबाद खंडपीठाचे स्वामी ला मुक्त करण्याचे आदेश

लॉरेन्स स्वामीच्या अटकेत कायदेशीर तरतुदींचा भंग

टोलनाका ठेकेदार लॉरेन्स स्वामी यांची अटक ही कायदेशीर तरतुदींचा भंग करून आहे. पोलिसांना इतर गुन्ह्यात अटकेची आवश्यकता नसेल, तर त्याला तात्काळ मुक्त करावे असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या आदेशानुसार लॉरेन्स स्वामी यांची तात्कळ सुटका करण्यात आली. लॉरेन्स स्वामी यांच्यावरील दरोड्यावरील गुन्ह्यात न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला होता. पोलिसांनी मोक्का  कायद्याअंतर्गत  स्वामींवर कारवाई करून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी वेळोवेळी तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करून २० दिवस कोठडी घेतली होती. स्वामींच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात या अटकेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ऍड. सतीश गुगळे आणि ऍड. प्रज्ञा तळेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून पोलिसांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिलेत.