वंध्यत्व उपचारतज्ञ,आरोग्य यंत्रणा, मीडिया, सामाजिक संस्था व केअर गिव्हर्स एकत्र

वीकॅनकन्सिव्ह द्वारे वंध्यत्व निवारणावर जनजागृती

पुणे :   भारतातील वंध्यत्वाचे प्रमाण १० ते १४ टक्के आहे ज्यामध्ये सहापैकी एक जोडपे वंध्यत्वाच्या समस्येने ग्रासले आहे. वीकॅनकन्सिव्ह या लैंगिक व प्रजनन आरोग्य जनजागृती परिसंस्थेद्वारे जगभरातील वंध्यत्व उपचारतज्ज्ञ, मीडिया भागीदार, आरोग्य क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती, सामाजिक संस्था आणि केअर गिव्हर्स एकत्र येत आहेत. लैंगिक आणि  प्रजनन आरोग्य दिन २०२१ च्या निमित्ताने वीकॅनकन्सिव्ह या जनजागृती मोहिमेचे आणि पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलेल्या वंध्यत्वावरील उपायांसाठी आधार देणाऱ्या परिसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या व्यासपीठाद्वारे वंध्यत्वाविषयीची माहिती आणि या समस्येने ग्रासलेल्या जोडप्यांना आधार देण्याचे काम करण्यात येणार आहे. वंध्यत्वावर उपचार घेऊन यशस्वीपणे त्यावर मात करण्यासाठी अशा जोडप्यांना या परिसंस्थेमार्फत मदत करण्यात येणार आहे. या लैंगिक व प्रजनन आरोग्य जनजागृती परिसंस्थेद्वारे जगभरातील वंध्यत्व उपचारतज्ज्ञ, मीडिया भागीदार, आरोग्य क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती, सामाजिक संस्था आणि केअर गिव्हर्स एकत्र येत आहेत.

 

जोडप्यांना वंध्यत्वावरील उपचार उपलब्ध करून देत त्यांना पालकत्वाचा आनंद उपभोगण्यासाठी मदत करण्याकरिता ही सकारात्मक आणि सक्षम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी  ओएसिस फर्टिलिटीचे सीओओ श्री. सुधाकर जाधव,  ओएसिस फर्टिलिटी क्लिनिकल हेड आणि वंध्यत्व उपचारतज्ज्ञ, डाॅ निलेश बलकवडे यांनी  वंध्यत्वाने बाधित जोडप्यांची माहिती आणि आकडेवारी सादर केली. या उपक्रमाचा उद्देश जोडप्यांपर्यंत योग्य माहिती पोहचविणे आणि त्यांना प्रेरित करणे तसेच लैंगिक व प्रजनन आरोग्याविषयी जनजागृती करणे हा आहे.असे सांगितले. त्याचबरोबर , या उपक्रमाविषयी अधिकाधिक लोकांना माहिती  आणि सकारात्मकता पसरवली गेली पाहिजे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.