“बाळासाहेब थोरात VS विखे पाटील!” | निळवंडेच्या पाण्यासाठी थेट पत्रयुद्ध!
संगमनेर अपडेट | पावसाचे पाणी... पण शेतात नाही? भंडारदरा आणि निळवंडे धरणं भरून वाहतायत, पण…


संगमनेर अपडेट | पावसाचे पाणी… पण शेतात नाही?
भंडारदरा आणि निळवंडे धरणं भरून वाहतायत, पण…
शेतकऱ्यांचे शेत मात्र अजूनही कोरडेच! 
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र ठोकलंय —
“ओव्हरफ्लोचं पाणी नदीत वाया घालवू नका… कालव्यांत सोडा!”
पत्रातील मुद्दे:
- पाणलोटात जोरदार पाऊस… धरणं भरलीत
![✅]()
- पण लाभक्षेत्रात (शेतकरी भागात) पावसाचं नाव नाही
![❌]()
- नदीमार्गे पाणी वाया जाण्याऐवजी कालव्यांत वळवा
![💧]()
- या पाण्याचा शेतात जिरवून सिंचनाखाली मोठं क्षेत्र आणता येईल
![🌾]()
थोरात यांचा आघाडीचा टोला –
“२०२२ आणि २०२३ मध्येही ही मागणी केली होती, तेव्हा उपयोग झाला. आता पुन्हा शेतकरी अडचणीत आहेत. निर्णय घ्या!”
१८२ गावांचा पाणीप्रश्न
हा प्रकल्प खुद्द थोरात यांनी मंत्री असताना पुढे रेटला होता!
तुम्हाला काय वाटतं – धरणातलं पाणी शेतात आलं पाहिजे ना?
कमेंट करा आणि बातमी व्हायरल करा! 


