
नवीन मतदार नोंदणीसाठी १५ वर्ष रहिवासी पुरावा ग्राह्य धरला जातो. आणि तसा पुरावाही या नोंदणीत नाही हे माहिती अधिकारात सिद्ध झाले आहे. तरी या बोगस नवे असणाऱ्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी मागणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी, अविनाश पवार, नितीन म्हस्के, उपजिल्हा अध्यक्ष मारुती रोहोकले यांनी निवेदन दिले आहे. ही बोगस नवे वगळली न गेल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.