अहमदनगर :
दिल्ली ते मुंबई दरम्यान १९ ते २४ डिसेंबरला होणार्या जी-टू-जी सायकल राईडमध्ये नगरचे उद्योजक जस्मित वधवा यांनी सहभाग नोंदविला आहे. या राईडमध्ये संपूर्ण देशातून फक्त ४० जणांनी सहभाग घेतला आहे. या राईडमध्ये १ हजार ४६० किलोमीटरचे अंतर पाच दिवसांमध्ये सायकलवर पूर्ण केले जाणार आहे. जी-टू-जी म्हणजे दिल्ली येथील इंडिया गेट ते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाचा, असा सायकलप्रवास ! यात दररोज २८० किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचे आव्हान नगरचे जस्मित वधवा यांच्यासमोर असणार आहे.
हि राईड जस्मित यशस्वीपणे पूर्ण करणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी दाखवत नगरच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असल्याचे मत जस्मित यांनी व्यक्त केले आहे. य लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि तिरंगा फाऊंडेशने त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.