कर्जत (प्रतिनिधी):
कर्जत नगर पंचायत अंतर्गत जुन्या प्रभाग क्रमांक 2 या बर्गेवाडी येथील हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटके यांच्या अथक परिश्रमातून नगर पंचायतचा कार्यकाळ संपत आल्याच्या अंतिम टप्प्यातही करण्यात आले. कर्जत शहरातील बर्गेवाडी येथे अत्यंत सुंदर व स्वच्छ परिसर करण्यात आला असून कर्जत शहरातील बारामती अशी ओळख निर्माण केलेल्या या प्रभागाचे नगरसेवक बापूसाहेब नेटके यांनी अनेक विकास कामे केली आहेत. आज नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलूमे, व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आलेल्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास नगरसेविका उषा म्हेत्रे राऊत, हर्षदा काळदाते यांचे सह माजी उपसभापती कांताबाई नेटके मुळे मॅडम, पिसाळ मॅडम याचे सह कुशाभाऊ नेटके व इतर मान्यवर उपस्थित होते.