ज्ञानसंपदा शाळेच्या प्रांगणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी दुर्बिणीद्वारे आकाशदर्शन

अहमदनगर :

सध्याच्या कोव्हिड विषाणू परिस्थितीत शाळा सुरु झाल्या असल्या तरी विद्यार्थी व शिक्षक व पालक यांच्यात चिंतेचे वातावरण आहेच. अशा परिस्थितीत शिक्षकांना प्रेरणा मिळावी, त्यांचा उत्साह द्विगुणीत व्हावा यासाठी ज्ञानसंपदा शाळेत आकाश दर्शनाचा उपक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी शाळेच्या प्रांगणात राबविण्यात आला. त्यास सर्वांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

पावसाळा संपला की चाहूल लागते गुलाबी थंडीची, याच काळात आकाश अगदी निरभ्र व स्वच्छ होते.  पश्चिमेच्या क्षितिजावर शनी, गुरु आदी ग्रह लक्ष वेधून घेतात . अशा या अंतराळातील बदलांचा सुखद अनुभती  देणारा अनुभव दुर्बिणीद्वारे  ज्ञानसंपदा शाळेत उपलब्ध करून दिल्या बद्दल शिक्षक व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.चंद्रदर्शन , चंद्राच्या पृष्ठावरील विवर,वलय आकार पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनीत साठे व मुख्याध्यापिका सौ.शिवांजली अकोलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेच्या विश्वस्तांनी या उपक्रमाचे कौतुक केले.  तसेच नियमित शाळा सुरु झाल्या नंतर  शासन नियम पळून असाच उपक्रम विद्यार्थी व पालकांसाठी राबविण्यात यावा असे सांगितले.