सुहास भाई ५७ व्या वर्षात पदार्पण …

अहमदनगर :

 

कोरोना काळात आपण अमाप संकटांचा सामना केला . माझ्याबाबत घडलेल्या आप्तेष्ठांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनांनी मी पुरता खचून गेलो होतो . मात्र माझे मित्र व मंचाच्या सदस्यांनी मला धीर दिला . त्यांना व समाजाला माझी गरज असल्याचे सांगून माझे मनोबल वाढवले आता या पुढील काळातील क्षण आणि क्षण मी समाजाप्रती बांधील असून लोकहिताची कामे करण्यातच मी माझे उरलेले आयुष्य खर्ची घालेल असा संकल्प नगरमधील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी सोडला आहे.  आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंचाच्या  सदस्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.  त्यांनी आता ५७  व्या वर्षात पदप्राण केले आहे.
नगरमधील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळे यांचा वाढदिवस मंचाच्या सदस्यांनी अतिशय साधेपणाने साजरा केला . त्यांच्या आगरकर मळा येथील निवासस्थानी हा कार्यक्रम झाला यावेळी  मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित , प्रा. सुनील कुलकर्णी , प्रकाशक अभय गुंदेचा , बी यु कुलकर्णी , जागरूक नागरिक मंचाचे सरचिटणीस कैलास दळवी , पहिलवान  भैरवनाथ  खंडागळे , शिरसाठ सर , मेट्रो न्यूज चे संपादक मकरंद घोडके आदी उपस्थित होते.
            कोरोना काळात रस्त्यावर उतरून समाज सेवा करण्यात २४ तास मग्न असलेल्या सुहास भाईच्या परिवाराला मोठ्या दुष्ट चक्रात अडकवले होते.  दोनच महिन्याच्या अवधीत कोरोनामुळे त्यांचे जेष्ठ बंधू , मेहुणे आणि पत्नी सौ. वंदना मुळे यांचे अकाली निधन झाले . अव्याहत पणे समाजसेवेत मग्न असलेल्या सुहास भाईवर काळाने केलेल्या आघातामुळे ते पुरते खचून गेले होते .  मात्र आता ते या दुःखातून सावरले असून समाजाप्रती आपण जे देणे लागतो ते देण्यासाठी ते पुन्हा समाजकार्यात व्यग्र होतील असा संकल्प मुळे यांनी सोडला आहे.   मुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर त्यांचा फोन खणखणत होता.  फेसबुक ट्विटर आणि व्हाट्स अप मधून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.  आमदार संग्राम जगताप , उद्योगपती नरेंद्र फिरोदिया , धनेश बोगावात , सरगमप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा . राम शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.
प्रतिनिधी प्रसाद शिंदे , ब्युरो रिपोर्ट  , न्यूज डेस्क महानगराची लाईफ लाईन , अहमदनगर .