
अहिल्यानगर महानगरपालिका
रखडलेली भरती प्रक्रिया अखेर रुळावर!
टोटल 45 तांत्रिक पदांची भरती लवकरच!
भरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला प्रस्ताव पाठवला गेला असून, करारनामाही झाला!
भरली जाणारी पदे:
– कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): 15
– कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): 3
– कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल): 1
– अभियांत्रिकी सहायक: 8
– विद्युत पर्यवेक्षक: 3
– लिपिक टंकलेखक: 13
– संगणक प्रोग्रामर: 1
– पशुधन पर्यवेक्षक: 1
फक्त अत्यावश्यक तांत्रिक पदांवर भरती, कारण आस्थापना खर्च वाढलेला!
आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली माहिती:
“कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी ही भरती गरजेची होती!”
राज्य सरकारने खर्चाची अट शिथिल करून 176 पैकी 45 पदांना मान्यता दिली!
लवकरच जाहिरात – संधीचं सोनं करू नका!