मोठा राजकीय अपडेट | छगन भुजबळांकडून सरकारवर गंभीर आरोप! 

पण या GR वरून आता ओबीसी नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सरकारवर थेट हल्ला चढवला आहे.

🔥
🚨मोठा राजकीय अपडेट | छगन भुजबळांकडून सरकारवर गंभीर आरोप! 🚨🔥

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठा वाद पेटलाय! राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर काढलेल्या नव्या शासन निर्णयामुळे (GR) मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आणि आंदोलकांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. पण या GR वरून आता ओबीसी नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सरकारवर थेट हल्ला चढवला आहे.


⚡ भुजबळांचे विधान धडाकेबाज
छगन भुजबळ म्हणाले –
👉 “सरकारने जीआरच्या नावाखाली हेराफेरी केली आहे.
👉 एका घरात १० माणसं असताना आणखी १० जणांना घुसवलं, तर आधीच्या लोकांना धक्का लागणार नाही का?
👉 एका ताटात दोन जण जेवत असताना अजून दोघांना बसवलं, तर आधीचं पोट कसं भरणार?
👉 नेमकं हेच ओबीसींच्या आरक्षणाबाबत घडणार आहे.”


📌 सरकारने काय केलं?

  • पहिल्या GR मध्ये लिहिलं होतं की “पात्र मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल.”

  • यावर जरांगे यांनी आक्षेप घेतला आणि “पात्र” हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली.

  • सरकारने लगेच दुसरा GR काढला आणि त्यात “मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी / कुणबी-मराठा / मराठा कुणबी प्रमाणपत्र” देण्याची तरतूद केली.

  • यामुळे, हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंद नसलेल्या लोकांनाही प्रमाणपत्र मिळू शकतं.


🔥 भुजबळांचा इशारा
“यामुळे ओबीसींचं नुकसान होणार आहे. त्यांना शिक्षण, नोकरी आणि राजकारणातील मिळणाऱ्या जागांमध्ये थेट गंडा बसणार आहे. म्हणूनच आम्ही न्यायालयात जाणार आहोत.”


🎯 जरांगे पाटील यांचा विजय?

  • मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती की “सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.”

  • थेट तसं न करता सरकारने “सरसकट” शब्द काढून टाकला आणि जीआर बदलला.

  • त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सोडलं, गुलाल उधळला आणि “मराठवाड्यातील ३ कोटी मराठे आता कुणबी झाले” असा जल्लोष केला.


💥 राजकीय समीकरणं तापली!
नव्या GR मुळे मराठा समाज आनंदी असला तरी ओबीसी नेते संतप्त झाले आहेत. एकीकडे सरकार “दोन्ही समाजांचा समतोल राखल्याचा” दावा करतेय, तर दुसरीकडे भुजबळ आणि ओबीसी गट याला “फसवणूक आणि हक्कांवर डाका” म्हणत आहेत.


📢 मेट्रो न्यूजचा सवाल :
👉 खरंच सरकारने मराठा समाजाला न्याय दिला का?
👉 की हा फक्त राजकीय डाव आहे ज्यामुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येणार आहे?

तुमचं मत काय आहे? 🗣️ कमेंटमध्ये नक्की लिहा!

#MetroNews #MarathaReservation #ChhaganBhujbal #ManojJarangePatil #MaharashtraPolitics #BreakingNews