युतीत भाजपला १५५- १६० जागा, आघाडीत काँग्रेस-उद्धव १०० पर्यंत
निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता महायुती व महाविकास आघाडीनेही जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला आहे. युतीचे नेते बुधवारीच संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करतील. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही गुरुवारी अंतिम बैठक होणार असून त्यानंतर तेही तिन्ही पक्षांचे जागावाटप जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुतीत भाजप हाच पक्ष सर्वाधिक जागा लढवेल, तर शिंदेसेना दुसऱ्या व अजित पवार गट तिसऱ्या स्थानी राहील. लोकसभेत सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे आघाडीत काँग्रेसच सर्वाधिक जागा लढवणार असल्याचे अंतिम झाले आहे.
◈ भाजप १५५ ते १६०, शिंदे गट ७८ ते ८० आणि अजित पवार गट ५० ते ५५ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढवणार असल्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केले. बुधवारी महायुतीचे तिन्ही नेते जागावाटप जाहीर करतील. भाजपची पहिली यादीही बुधवारीच जाहीर होऊ शकते.
◈ महाविकास आघाडीत काँग्रेसला १०५ ते ११०, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ९५ ते १०० तर राष्ट्रवादीला (शरद पवार) ८० ते ८५ जागा मिळू शकतात. छोट्या घटक पक्षांना तिघांच्या कोट्यातून काही जागा दिल्या जातील.