महायुतीला ८० लाख लाडक्या बहिणींची मते हवी!
लोकसभेला महायुतीची निराशाजनक कामगिरी झाली. त्यापासून धडा घेत त्यांनी विधानसभेपूर्वी ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली. मध्यप्रदेशात भाजपला या योजनेमुळे ४० लाख मतांचा फायदा झाला. त्यामुळेच ती योजना महायुतीने कॉपी केली. पणमध्यप्रदेशच्या तुलनेत महायुतीने एक कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभार्थी बनवले. महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत मध्यप्रदेशपेक्षा दुप्पट म्हणजे ८० लाख लाडक्या बहिणींची मते हवी आहेत. ती त्यांना मिळतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मध्यप्रदेशाच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये ९३ लाख लाडक्या बहिणी अधिक आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशाचाच निकष ठेवला तर महायुतीला महाराष्ट्रात लाडक्या बहिणींची दुप्पट मते हवी आहेत.