उद्या दिसणार ब्ल्यू मून 

३१ ऑक्टोबरला  रात्री पाहता येणार  ब्ल्यू मून 

 

महिन्यातून एकदा होणारे चंद्राचे दर्शन ऑक्टोबर महिन्यात दोनदा होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला ब्ल्यू मून असं म्हंटल जात.  येत्या ३१ ऑक्टोबरला रात्री ८.१९ मिनिटांनी हा ब्ल्यू मून पाहण्याचा योग्य आहे.

२ ऑक्टोबरला पहाटे २. ३५ वाजता महिन्यातील पहिले पूर्ण चंद्रदर्शन झालं होत. त्यांनंतर आता महिन्या अखेरीला ३१ ऑक्टोबरला पूर्ण चंद्रदर्शन होणार आहे.

ब्ल्यू मुनमुळे यंदा १३ पूर्ण चंद्र दिसणार आहेत. २०१८ साली ३१ जानेवारी व ३१ मार्च अश्या २ दिवशी ब्ल्यू मून दिसले होते.  पुढील ब्ल्यू मुन ३१ ऑगस्ट २०२३ ला दिसणार आहे.