केडगावला रंगला “होम मिनिस्टर कार्यक्रम

होम मिनिस्टर कार्यक्रमात स्त्री शक्तीचा जागर....

ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त ,  केडगावच्या सोनेवाडी चौक येथील परिसरात “होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा”  या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर  यांनी आपल्या आवाजाने व कल्पकतेने सर्वांना खिळवून ठेवले. “होम मिनिस्टर -खेळ पैठणीचा”  या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती तथा नगरसेविका लताताई शेळके यांच्या वतीने महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई जगताप, वैशाली कोतकर, उद्योजक सचिन (आबा) कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेविका गौरीताई ननावरे, नगरसेविका आशाताई कराळे, सविताताई कराळे, पल्लवी जाधव, अनिता बेरड, बलभीम आप्पा शेळके, सुरज शेळके, गणेश ननावरे, सुनिल उमाप, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, गणेश सातपुते आदींसह केडगाव भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

केडगाव येथे रंगलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात स्त्री शक्तीचा जागर करुन महिलांच्या कलागुणांचा हा खेळ रंगला होता. संगीताच्या तालावर महिलांनी ठेका धरुन या कार्यक्रमाचा आनंद लुटला. तळ्यात मळ्यात, फुगे फोडणे, प्रश्‍न उत्तर, उखाणे, नृत्य अशा सर्वच स्पर्धेत महिलांनी भरभरुन सहभाग नोंदवत केडगावच्या वहिणींनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून भाऊजींच्या कल्पकतेला प्रचंड दाद दिली.

केडगाव मध्ये  प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. महिलांच्या विविध स्पर्धने होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. रंगलेला हा खेळ पैठणीचा कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी विविध मनोरंजनात्मक व कौशल्यपूर्ण खेळाचा आनंद लुटला.
होम मिनिस्टरच्या मानकरी ठरलेल्या विजेत्या महिलेस ‘सोन्याची नथ’ प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय पारितोषिक ‘चांदीचा करांडा’, तर तृतीय क्रमांकाचे ‘पैठणी’ पारितोषिक विजेत्या महिलांना देण्यात आले. याशिवाय विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या.   महिला, युवती, वयस्क  महिलांसह चिमुकल्या मुलींनी सुद्धा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.