यंदा डीजे वाजणार की नाही?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने बोलविण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत चांगलीच गरमागरमी झालेली पहायला मिळाली. बैठकीत डीजे वाजविण्यास परवानगी आहे का? आम्हाला डीजे लावण्यास परवानगी द्या, अशीही मागणी काहींनी केली होती. तर कर्णकर्कश आवाज करणारे आणि नागरिकांचे आरोग्य खराब करणारे डीजे नकोच, असे सांगत काहींनी डीजेला विरोध केला. यंदा शांतता समितीच्या बैठकीचे अनेकांना निमंत्रण नव्हते. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.असे असताना आता गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा डीजे वाजणार का? पोलिस डीजेला परवानगी देणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी डीजे बुक केले आहेत, ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्यास गोंधळ होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.