बॉर्डर २ च्या चित्रीकरणास सुरुवात!
मनोरंजन : दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाने घवघवीत यश मिळविले. आता ‘बॉर्डर’च्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा ताफा या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. ‘बॉर्डर२’ हा भूषण कुमार, कृष्ण कुमार, जे. पी. दत्ता आणि निधी दत्ता यांच्या भक्कम टीमद्वारे बनविला जात आहे. गुलशन कुमार आणि टी-सिरीज प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करीत आहेत. देशभक्ती आणि शौर्याच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट उत्कंठावर्धक ॲक्शन, भावनिक कथा आणि थरारक नाट्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज आहे. २०२६ मधील सर्वांत प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी ‘बॉर्डर २’ हा एक आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जसजसे पुढे सरकत आहे, तसतसे प्रेक्षक एका उंचावलेल्या देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या कथानकाची प्रतीक्षा करीत आहेत.