BREAKING | लाडकी बहीण योजना बंद होणार का? तिजोरीवर ताण, पण सरकारचा नकार! अमृता फडणवीस यांचं स्पष्ट वक्तव्य!
राज्याच्या लोकप्रिय ‘लाडकी बहीण’ योजनेवरून चर्चेचं वादळ उठलंय! मंत्री दत्ता भरणे, छगन भुजबळ यांच्यानंतर आता अमृता फडणवीस यांनीही योजनेबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

“लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येतोय, पण ही योजना बंद होणार नाही. राज्य सरकार आपल्या लाडक्या बहिणीसाठी आर्थिक ताण सहन करायला तयार आहे! फिल्टरेशन होणं आवश्यक आहे.”
काय आहे प्रकरण?
मंत्री दत्ता भरणे यांनी म्हटलं – योजनेमुळे विकास निधीला उशीर
छगन भुजबळ यांची कबुली – तिजोरीवर ताण!
अमृता फडणवीस – ताण आहे, पण योजना थांबणार नाही
पुण्यातील लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. त्याच कार्यक्रमात त्यांनी पुण्याच्या समस्यांवरही भाष्य केलं –
“रस्ते नीट नाहीत, वाहतूक कोलमडलेली… पुण्यात सामान्य माणूस सुखी नाही, तोपर्यंत देवेंद्रजी पुण्याच्या फेऱ्या कमी करणार नाहीत!”
पॉइंट टू नोट:
योजना सुरू राहणार असली तरी लवकरच ‘फिल्टरिंग’च्या नावाखाली बदल संभवतो, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली आहे.
युवा वाचकांनो, तुमचं काय मत?
“तिजोरीपेक्षा बहीण महत्त्वाची!” की “सर्व योजनांना आर्थिक शिस्त हवी?”
कमेंट करा, शेअर करा आणि अपडेटसाठी @MetroPortal फॉलो करत राहा!